बीजिंग : कोणत्याही गोष्टीसाठी लोन घेताना आपल्याला बँक अथवा लोन देणाऱ्या संस्थेला पुरावा द्यावा लागतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र चीनमधील एक ऑनलाईन कंपनी लोन देण्याच्या नावाखाली गॅरंटी म्हणून महिलांकडून न्यूड फोटोंची मागणी करतेय. यासोबतच वेळेत लोनची परतफेड न केल्यास हे फोटो प्रसिद्ध केले जातील अशीही धमकी कंपनीकडून दिली जातेय. 


डेली मेलनुसार, एका कर्जदाराने दिलेल्या माहितीनुसार तिने ऑनलाईन कर्ज देणाऱ्या त्या संस्थेकडून तिने ५०० युआन ३० टक्क्यांनी घेतले होते. जुने कर्ज फेडण्यासाठी नवे कर्ज घेतले. त्या कर्जदारावर ५५,००० युआनचे कर्ज आहे आणि यासाठी तिच्याकडून न्यूड फोटोची मागणी केली जातेय. 


ही कंपनी कर्ज घेणाऱ्यांकडून त्यांचे न्यूड फोटो, आयडी, फोननंबर, घराचा पत्ता आदी सर्व माहिती घेते.