ब्रसेल्स : युरोपियन युनियनच्या २८ देशांच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी ब्रसेल्समध्ये शिखर परिषद भरवण्यात आली होती. या शिखर परिषदेत ब्रिटन पंतप्रधानांच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना अचानक एक आवाज घुमू लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉशरुममधून उत्तेजना वाढवणारा हा सेक्सचा आवाज असल्याचं काहींना लक्षात आलं. सुरूवातीला याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले मात्र आवाज आणखीनच वाढल्याने सर्वांनाच धक्का बसला. एकीकडे गंभीर विषयावर चर्चा तर दुसरीकडे सेक्सचा आवाज ऐकू येत असल्याने खळबळ उडाली.


स्लोव्हेनियाचे अधिकारी आणि जर्मन अधिकाऱ्याला रात्री एकत्र पकडल्याचे तसेच हे दोघे त्या वॉशरूममध्ये सेक्स करत असल्याचं वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. दरम्यान, सेक्स करणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये जर्मन व्यक्ती असल्याचे वृत्त ब्रेसेस्लमधील जर्मन सूत्रांनी फेटाळले आहे.