जकार्ता : इंडोनेशियात अनेक हिंदू मंदिरे आहेत. त्यातील अनेक मंदिरांची रहस्ये आजच्या विज्ञानयुगातही उलगडली गेली नाहीत. शेकडो वर्षांपूर्वी तिथे शिवलिंग कंडी सुकुह नावाच्या ठिकाणी उत्खननात सापडले होते. जावा बेटावर असलेल्या या शिवमंदिरातील स्फटिकाच्या शिवलिंगाबाबत असेच एक रहस्य समोर आले आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे हे रहस्य

जेव्हा या मंदिराचे उत्खनन करण्यात आले, तेव्हा अनेक मौल्यवान कलाकृती सापडलेल्या. ज्या आता इंडोनेशियाच्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवल्या आहेत. या स्फटीकाच्या शिवलिंगात एक पाण्यासारखा पदार्थ आहे.

मात्र अजूनपर्यंत वैज्ञानिकांना हा द्रवपदार्थ काय असावा याचा उलगडा करता आलेला नाही. परंतु स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार अमृतमंथनातून निघालेले हे अमृत या शिवलिंगात द्रव स्वरूपात आहे.

द्रवपदार्थ दैवी असल्याचा दावा

शेकडो वर्षांपूर्वी सापडलेल्या या शिवलींगातील पाणी न सुकता अजूनही तसेच आहे, त्यामुळे हा द्रवपदार्थ दैवी असल्याचे मानले जाते.