फ्लोरिडा : अमेरिकेच्या फ्लोरिडामधल्या नाईट कल्बमध्ये गोळीबार झाला आहे. या गोळीबारामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 जण जखमी झाले आहेत. पल्स गे नाईट क्लबमध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे. कल्बमध्ये काही लोक बंदूक घेऊन घुसले आणि त्यांनी क्लबमध्ये असलेल्यांना ओलिस धरलं अशी माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्लोरिडामधल्या पोलिसांनी या क्लबला चारही बाजूनं वेढलं असून ओलिसांना सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या क्लबपासून नागरिकांनी दूर राहावं असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे. रविवारी पहाटे 2 च्या सुमारास या गोळीबाराला सुरुवात झाल्याची माहिती तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली आहे.