स्पेलिंग मिस्टेकमुळे टळली ६७ अब्ज रुपयांची चोरी
एका स्पेलिंग मिस्टेकमुळे जवळपास 67 अब्ज रुपयांची चोरी टळल्याची घटना घडली आहे. बांग्लादेशच्या सेंट्रक बँक आणि न्यूयार्क फेड यांच्यात ऑनलाईन पद्धतीने पैसै ट्रान्सफर होत असतांना हॅकर्सने साडे पाच अरब रुपये चोरले. आत्तापर्यंत चोरीच्या इतिहासातली ही सर्वात मोठी घटना आहे.
मुंबई : एका स्पेलिंग मिस्टेकमुळे जवळपास 67 अब्ज रुपयांची चोरी टळल्याची घटना घडली आहे. बांग्लादेशच्या सेंट्रक बँक आणि न्यूयार्क फेड यांच्यात ऑनलाईन पद्धतीने पैसै ट्रान्सफर होत असतांना हॅकर्सने साडे पाच अरब रुपये चोरले. आत्तापर्यंत चोरीच्या इतिहासातली ही सर्वात मोठी घटना आहे.
हँकर्स या दरम्यान श्रीलंका आणि फिलीपाईन्स या देशातील बँकांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये फिलिपाईन्समध्ये 8 कोटी 10 लाख डॉलर तर श्रीलंकेला दोन कोटी डॉलर पाठवले.
हॅकर्सने एका फाऊंडेशनचं नाव चुकीचं लिहिल्याने ट्रान्सफरची प्रक्रिया थांबली आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. श्रीलंकेत पाठवण्यात आलेले पैसे परत मिळाले आहे पण फिलिपाईन्समध्ये गेलेले पैसे अजून परत मिळालं नसल्याचं बांग्लादेशने म्हटलं आहे.