कोण आहे रेश्मा? शहीद कॅप्टन अंशुमनची पत्नी स्मृती सिंह समजून नेटकऱ्यांनी तिला केलं ट्रोल

सोशल मीडियावर एका तरुणीचा फोटो व्हायरल होतो आहे. या तरुणीला नेटकरी कॅप्टन शहीद अंशुमन सिंगची पत्नी स्मृती समजून तिला ट्रोल करण्यात येते आहे. ही तरुणी खरं तर केरळची influencer रेश्मा सेबॅस्टियन आहे. 

| Jul 17, 2024, 02:53 AM IST
1/8

भारतीय लष्करातील शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांची 26 वर्षीय पत्नी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अंशुमनच्या आई वडिलांनी तिच्यावर अनेक आरोप केले आहेत. ती पदक आणि पैसे घेऊन माहेरी निघून गेली असा आरोप त्यांनी केलाय. त्यानंतर सोशल मीडियावर तिच्याबद्दल उलटसुलट चर्चा रंगली आहे.   

2/8

अंशुमनच्या आई-वडिलांच्या मुलाखतीनंतर सोशल मीडियावर स्मृती सिंह ट्रोल होते आहे. पण सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अजून एका तरुणीला ट्रोल केलंय. कारण नेटकऱ्यांनी तिला स्मृती सिंह समजून तिला ट्रोल केलंय. 

3/8

खरं तर नेटकरी केरळची प्रसिद्ध फॅशन इन्फ्लुएंसर रेश्मा सेबॅस्टियन हिला एका शहीद जवानाची पत्नी मानून ट्रोल करत आहेत. स्मृती सिंग आणि रेश्मा सेबॅस्टियन यांची चेहऱ्याची ठेवण फार सारखी दिसतात. रेश्माला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला तिने चोख प्रत्युत्तर दिलंय.   

4/8

तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करताना रेश्माने लिहिलंय की, 'हे स्मृती सिंग (भारतीय लष्करातील शिपाई कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या पत्नी) यांचं पेज/आयजी खातं नाही. आधी प्रोफाइल तपशील आणि बायो नीट वाचा. कृपया चुकीची माहिती आणि द्वेष पसरवणे टाळा.'  

5/8

पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, 'प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतं.' याशिवाय रेश्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती तिला लष्करी अधिकाऱ्याची पत्नी म्हणत फेसबुक पोस्टमध्ये तिची खिल्ली उडवत आहे, अशी ती पोस्ट आहे. 

6/8

पोस्ट शेअर करताना रेश्माने लिहिलंय की, 'जे लोक मला शहीद कॅप्टन अंशुमनची पत्नी मानून सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत, हे मूर्खपणाचे आहे! स्मृती सिंह यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवण्यासाठी माझ्या ओळखीचा वापर केला जात आहे. आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत.'

7/8

रेश्मा ही influencer तर आहे शिवाय ती अभियंता आणि व्यवसायाने मॉडेल आहे. 2011 पासून ती मॉडेलिंग करत आहे. तर ती पती आणि मुलीसोबत जर्मनीत राहते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. रेश्माचे इंस्टाग्रामवर 349 हजार फॉलोअर्स आहेत. 

8/8

स्मृती सिंह यांच्याबद्दल सांगायचं बोलायचं झालं तर, 19 जुलै 2023 रोजी सियाचीनमध्ये भारतीय लष्कराच्या दारूगोळा भांडारात आग लागली होती. कॅप्टन अंशुमनने आपल्या सहकारी सैनिकांचे प्राण वाचवताना सर्वोच्च बलिदान दिलं. यानंतर, यावर्षी 6 जुलै 2024 ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कॅप्टन अंशुमन सिंह यांना मरणोत्तर कीर्ती चक्र देऊन सन्मानित केलं.