नवी दिल्ली : एका प्रसिद्ध स्पोर्ट्स चॅनेलवरील अँकर एरिन अँड्र्यूज कोर्टातील तिच्या केसच्या सुनावणीदरम्यान चांगलीच भावूक झाली. २००८ मध्ये बनवण्यात आलेल्या तिच्या न्यूड क्लिपबाबतच्या सुनावणीदरम्यान एरिनला कोर्टातच रडू कोसळले, 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००८मध्ये जेव्हा एरिन अँड्यूज नॅशविलच्या मॅरियम होटेलमध्ये थांबली होती. यावेळी ही न्यूड क्लिप बनवण्यात आली. त्यानंतर ही क्लिप इंटरनेटवर अपलोड करण्यात आली होती. बदला घेण्यासाठी कोणीतरी हे कृत्य केल्याचं सांगण्यात आलं होतं. एरिन प्रसिद्ध टीव्ही अँकर होती तिची वाढती प्रसिद्धी पाहून तिला बदनाम कऱण्याच्या उद्देशाने मिशेल डेविड बॅरेट नावाच्या एका युवकाने तिची न्यूड क्लिप बनवली आणि इंटरनेटवर अपलोड केली. 


अशा प्रकारची क्लिप बनवण्यात आल्याचे तिला तिच्या मित्रांकडून कळले होते. हा स्वत:चा व्हिडीओ इंटरनेटवर पाहिल्यानंतर एरिनला जबर धक्काच बसला. यादरम्यानच्या काळात तिला बरंच काही सहनही करावे लागले. मात्र हे सर्व कोर्टात सांगताना तिला रडूच कोसळले. याप्रकरणी एरिनने बॅरेट आणि हॉटेलविरोधात केस दाखल केलीये. या केसवर सुनावणी सुरु आहे.