ट्रम्पना झटका, मुस्लिम प्रवेशबंदीच्या आदेशाला स्थगिती
सात मुस्लिम राष्ट्रांमधील निर्वासितांना अमेरिकेत बंदी घालण्याचा निर्णय ट्रम्प सरकारनं घेतला होता
वॉशिंग्टन : सात मुस्लिम राष्ट्रांमधील निर्वासितांना अमेरिकेत बंदी घालण्याचा निर्णय ट्रम्प सरकारनं घेतला होता, पण या आदेशाला अमेरिकेतल्या न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे. ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन या देशातील निर्वासितांना अमेरिकेत येण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. मुस्लिम दहशतवादापासून अमेरिकेचा बचाव करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प सरकारनं सांगितलं होतं.