तैपेई : अंत्ययात्रा तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील.. शोकसागरात बुडालेले लोकं... कुणी रडत तर कुणी घोषणाबाजी करत आपल्या नेत्याला किंवा नातेवाईकाला निरोप देत असतो. मात्र तैवानमध्ये निघालेली एका नेत्याची अंत्ययात्रा जगावेगळी ठरली..  कारण या अंत्ययात्रेत चक्क पोल डान्सर्सना नाचवण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तैवानमधील नेते थांग यांचं दिर्घ आजारामुळे निधन झालं. 3 जानेवारीला त्यांची अंत्ययात्रा कढण्यात आली. त्यांच्या अंत्ययात्रेत चक्क 50 पोल डान्सर्सना नाचवण्यात आलं. 


या पोल डान्सर्ससाठी वेगवेगळ्या रंगाच्या जीप आणण्यात आल्या होत्या. थांग यांना मौज मस्ती करण्याची आवड होती. अंत्ययात्रेत पोलडान्सर्स नाचवाव्या अशी इच्छा त्यांनी भावाकडे व्यक्त केली होती. म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी अंत्ययात्रेला पोलडान्सर्स नाचवून त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीनं निरोप दिला.


बिकनी घालून पोल डान्स करत निघालेली ही अंत्ययात्रा जगावेगळी ठरली. ही अंत्ययात्रा पहाण्यासाठी रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी झाली होती.