फ्लोरिडामध्ये दहशतवादी हल्ला, 5 जण ठार
अमेरिकेमधल्या फ्लोरिडातल्या फोर्ट लॉडरडेल विमानतळावर दहशतवादी हल्ला केला गेला. या हल्ल्यात 5 जण ठार झाले. तर 8 जण जखमी झालेत.
फ्लोरिडा : अमेरिकेमधल्या फ्लोरिडातल्या फोर्ट लॉडरडेल विमानतळावर दहशतवादी हल्ला केला गेला. या हल्ल्यात 5 जण ठार झाले. तर 8 जण जखमी झालेत.
हा हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय. हल्लेखोराला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरु आहे.
दरम्यान या घटनेशी आणखी इतर कोणी संबंधित आहेत का याचाही तपास केला जात आहे.