इस्तंबूल : तुर्कीमधील इस्तंबूलमध्ये दहशतवादी हल्ला झालाय. नाईटक्लबमध्ये नववर्षाच्या पार्टीत झालेल्या गोळीबारात 35 ठार तर 40 हून अधिक जखमी झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्तंबूलमधील रैना नाईटक्लबमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. त्यावेळी स्थानिक वेळेनुसार रात्री दीडच्या सुमारास हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला.


आत्मघातकी हल्ला करणारा दहशतवादी हा नाईटक्लबमध्ये सांताक्लॉजचा ड्रेस परिधान करुन आल्याचं सांगण्यात येतंय. हा हल्ला झाला त्यावेळी नाईटक्लबमध्ये शंभरहून अधिक जण उपस्थित होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तुर्कीमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय. 


सर्वत्र पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय. कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.