नवी दिल्ली : काश्मीर मधील हिंसाचार आणि दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना अलकायदाने पाकिस्तानविरोधात वक्तव्य केलं आहे. अलकायदा संघटनेनं पाकिस्तान आणि त्यांच्या सैन्याला देशद्रोही म्हटलं आहे. पाकिस्ताननं काश्मीरच्या लोकांशी देशद्रोहीपणा केल्याचा आरोप अलकायदानं केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीरच्या जनतेनं चांगले-वाईट, मदत करणऱ्या आणि स्वार्थी लोकांमधला फरक ओळखावा असं दहशतवादी संघटना अलकायदाचा प्रवक्ता उसामा महमूद याने म्हटलं आहे. 


काश्मीरमध्ये युध्द करणं हा तिथल्या लोकांवर अन्याय असून, काश्मीरमधील लोकांच्या जखमा भरण्याऐवजी त्यांना उजाळा देण्याचं कार्य पाकिस्तान आणि तेथील भ्रष्ट सैन्य करत आहे. दहशतवादी संघटनेच्यामते काश्मीरचा मुद्दा पाकिस्तान आणि त्यांच्या सैन्यासाठी एक खेळ असं वक्तव्य महमूदनं केलं आहे. 


हा ११ पानांचा संदेश दहशतवादी संघटना अलकायदाने इंग्रजी, हिंदी, बंगाली आणि उर्दू भाषेत प्रसिध्द केला आहे.