मुलीची हत्या आणि स्वत:च्या आत्महत्येचं त्यानं केलं `फेसबुक लाईव्ह`
थायलंडच्या फूकेट प्रांतात एका व्यक्तीनं आपल्या 11 वर्षांच्या मुलीची हत्या केल्यानंतर गळफास लावून घेत आत्महत्या केली... धक्कादायक म्हणजे, त्यानं ही संपूर्ण घटनेचं `फेसबुक लाईव्ह` केलं... अनेकांना ही घटना फेसबुकवर लाईव्ह पाहायला मिळाली.
बँकॉक : थायलंडच्या फूकेट प्रांतात एका व्यक्तीनं आपल्या 11 वर्षांच्या मुलीची हत्या केल्यानंतर गळफास लावून घेत आत्महत्या केली... धक्कादायक म्हणजे, त्यानं ही संपूर्ण घटनेचं 'फेसबुक लाईव्ह' केलं... अनेकांना ही घटना फेसबुकवर लाईव्ह पाहायला मिळाली.
थायलंड पोलिसांना मंगळवारी ही माहिती मिळाली. ही घटना फेसबुकवर पाहणाऱ्या दोन जणांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर अधिकाऱ्यांनाही चांगलाच धक्का बसला.
माहिती मिळाल्यानंतर, ही घटना जिथं घडली त्या इंटरनॅशन एअरपोर्टजवळच्या हॉटेलमध्ये पोलीस दाखल झाले... तेव्हा मुलगी आणि एक व्यक्ती दोघेही मृतावस्थेत आढळले. या व्यक्तीचे त्याच्या पत्नीशी भांडण झाल्यानंतर हे कृत्य केल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
फूकेटच्या गव्हर्नरनं लोकांनी हा चार मिनिटांचा व्हिडिओ शेअर न करण्याची विनंती केलीय. यापूर्वीही अमेरिकेतल्या ओहायोमध्ये एका व्यक्तीनं फेसबुक लाईव्हमध्ये स्वत:वर गोळी झाडून घेतली होती.