COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅरिस: देशात छपाट्याने वाढत असलेल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पॅरिस, मॉस्को, माद्रिद, अथेन्स या चार मोठ्या शहरातील महापौरांनी डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर २०२५ पर्यंत बंदी घालण्याचे निर्णय घेतलाय.


डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर पुढील दहा वर्षे पूर्णपणे बंदी घातली जाणार आहे. तसेच डिझेल वाहनांऐवजी लोकांना सायकल चालवण्यासाठी अथवा पायी चालण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती या शहरातील महापौरांनी दिली.


मॉस्कोमध्ये दर दोन वर्षांनी होणाऱ्या 'सी ४०' अधिवेशनात देशातील  वायूप्रदूषणाच्या वाढत्या समस्येमुळे डिझेल गाड्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय.


जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, दरवर्षी वायूप्रदूषणामुळे ३० लाख लोकांचा मृत्यू होतो. वायुप्रदुषणामुळे मोठ्या प्रमाणात श्वसनाचे आजार होतात.


पॅरिस शहरात १९९७ आधीच्या नोंदणीकृत डिझेल वाहनांवर याआधीच बंदी घालण्यात आली आहे.