जगातला सर्वात श्रीमंत माणूस बिल गेट्स करणार सर्व संपत्ती दान
जगातला सर्वात श्रीमंत माणूस आणि मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. बिल गेट्स त्यांची सगळी संपत्ती सामाजिक संस्थांना दान करणार आहेत.
लंडन : जगातला सर्वात श्रीमंत माणूस आणि मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. बिल गेट्स त्यांची सगळी संपत्ती सामाजिक संस्थांना दान करणार आहेत.
मी माझ्या मुलांना संपत्ती देणार नाही तर ती दान करणार आहे, अशी घोषणा त्यांनी केल आहे. टिव्हीवरच्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी ही घोषणा केली. बिल गेटेस यांची आताच्या घडीला 5.45 लाख कोटी इतकी संपत्ती आहे.
बिल गेट्स यांना 20 वर्षांची जेनिफर, 17 वर्षांचा रॉरी आणि 14 वर्षांची फिबी अशी तीन मुले आहेत. त्यांना आपण उत्तम दर्जाचे शिक्षण देऊ. पण संपत्ती देणार नाही, मुलांना थोडे पैसे नक्कीच देऊ, पण त्यांनी बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहावं. त्यांना जास्त पैसा दिला तर उलट ते स्वतःचं करिअर घडवू शकणार नाहीत, असं बिल गेट्स म्हणालेत.
बिल गेट्स त्यांची सगळी संपत्ती बिल अँड मेलिंडा गेटस् फाऊंडेशन या त्यांच्या संस्थेला देणार आहेत. ही संस्था जगभरात शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवते.