टोकियो : फॅमिली बिझनेस चालवणे ही भारतील एक जणू परंपराच आहे. अनेक पिढ्या अशा आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष त्यांचा फॅमिली बिझनेस सांभाळलाय.
जगात एक हॉटेल असे आहे ज्याने एक एैतिहासिक रेकॉर्ड केलाय. हे हॉटेल इसवी सन ७०५ मध्ये बांधलेले आहे. 'Nishiyama Onsen Keiunkan' हे हॉटेल जपानमध्ये असून महिटो या कुंटुबाचा तो फॅमिली बिझनेस आहे. हे हॉटेल १,३११ वर्षे जून आहे आणि अत्तापर्यंत ५२ पिढ्यांकडून चालवण्यात आले आहे.


हा रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदणी झालीये. हे हॉटेल हॉट स्प्रिंग बाथकरिता प्रसिद्ध आहे. ७व्या शतकात महिटो हे सम्राट टेंजी यांचे पुत्र होते. हे हॉटेल १९९७मध्ये रेनोव्हेशन करण्यात आलेले. या हॉटेलमध्ये जपानच्या संस्कृती आणि परंपरेप्रमाणे सर्व्हिस दिली जाते. तिथे गेल्यानंतर जपानचा सांस्कृतिक पेहराव घालायला देतात. हे हॉटेल अजूनही जपानमधील लोक आणि पर्यटकांकडून पसंत केले जाते.