COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जियांग्सू : चीनमध्ये तरूणाची बोटं मेट्रोच्या दारात अडकल्याने, त्याची मेट्रोसह फरपट झाली. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, मात्र मेट्रोमध्ये ऐनवेळेस चढणे आणि उतरणे किती धोकादायक आहे, याचं पहिलं उदाहरण चीनमध्ये समोर आलं आहे. तेव्हा मेट्रोत चढताना आणि उतरताना उशीर करू नका.


चीनमधील जियांग्सूमध्ये हा तरूण मेट्रोत चढला, पण तो चुकीच्या गाडीत चढल्याचं त्याला लक्षात आलं, यानंतर त्याने चालत्या ट्रेनमधून, दार बंद होण्यावेळी उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रेनच्या ऑटोमॅटिक दारात त्याची बोट अडकली, यानंतर ट्रेनसोबत त्यांची लांबपर्यंत फरपट झाली.


ट्रेनसोबत बोटं अडकल्यावर त्यांची फरपट होत होती, तेव्हा तो जीवाचे आकांताने ओरडला, धावला, यानंतर सुदैवाने प्लॅटफॉर्मवरील लोकांनी मेट्रो चालकाला कल्पना देऊन गाडी थांबण्याचा प्रयत्न केला.


गाडीचा वेग वाढण्याआधी सुदैवाने तरूणाचं अडकलेलं बोट सोडवण्यात तरूण यशस्वी झाला, त्याने सुटकेचा निश्वास टाकला. या घटनेचा व्हिडीओ नेटीझन्सकडून मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.