नवी दिल्ली : हल्ली उंचच उंच इमारतींमध्ये लिफ्ट गरजेची असते. जगात अशाही काही लिफ्ट्स आहेत ज्यात चढण्याआधी तुम्हाला कमीत कमी १० वेळा तरी विचार करावा. जगातील विविध देशांमध्ये अशा काही लिफ्ट्स आहेत ज्यात चढण्यासाठी लोक चढण्यास घाबरतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॅमेटस्क्वांड लिफ्ट स्वित्झर्लंड - सेंट्रल स्वित्झर्लंडमध्ये लेक लॉरेन्सच्या जवळ बर्जस्टॉक माऊंटन पार्कमध्ये ही लिफ्ट आहे. युरोपातील ही सगळ्यात उंच लिफ्ट आहे. याची उंची ४०० फूट आहे. 


अमेरिकेच्या सेंट लुईसमधील या लिफ्टची उंची ६३० फूट आहे. एकावेळी पाच जण या लिफ्टमधून प्रवास करु शकतात. 


बायलाँग लिफ्ट चीन - ही जगातील सर्वात उंच लिफ्टसपैकी एक आहे. यात एकाच वेळी ५० लोक प्रवास करु शकतात. याची उंची १०७० फूट आहे. 


स्कायव्हूय एरिक्सन ग्लोब स्विडन - ही जगातील सर्वात मोठी गोलाकार बिल्डिंग आहे. या बिल्डिंगची उंची ४२५ फूट इतकी आहे. 


स्काय टॉवर, न्यूझीलंड - ऑकलंडमध्ये ही लिफ्ट ६१० फूट इतकी उंच आहे. ४० सेकंदात ही लिफ्ट वरुन खाली जाते. एकावेळी १५ जण यातून प्रवास करु शकतात. 


द फॉलकिर्क व्हील, स्कॉटलँड: ही लिफ्ट ८ मजली इमारतीइतकी उंच आहे. ही जितक्या वेगाने वर जाते त्याच वेगाने खाली येते. 


तैपेई १०१ तैवान - १६६७ फूट उंचीच्या १०१ मजल्यांच्या बिल्डिंगमध्ये ६७ लिफ्ट्स आहेत.