लॉस एंजेलिस : जगात अनेक अशा कंपन्या आहेत ज्या आपल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत असतात. मोठमोठ्या कंपन्यासोबतच लहान कंपन्यांमध्येही अशा उपाययोजना राबवण्याचे प्रमाण वाढू लागलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्येही अशीच एक कंपनी आहे ती म्हणजे स्टील हाऊस अॅडव्हरटायझिंग एजन्सी. मार्क डगलस यांनी २०१०मध्ये या कंपनीची स्थापना केली. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी तसेच त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवी योजना लाँच केलीये.


या योजनेनुसार कर्मचाऱ्याला सुट्टीसाठी दरवर्षी दीड लाख रुपये जातील. या पैशांच्या सहाय्याने तो जगात कुठेही फिरायला जाऊ शकतो. यासाठी केवळ इतकेच करायचे की ज्या ठिकाणी एखादा कर्मचारी फिरायला जाईल त्याच्या संपूर्ण खर्चाचे बिल कंपनीला द्यायचे. त्यानंतर कंपनी हा खर्च त्या कर्मचाऱ्याला देईल. 


कर्मचाऱ्यांकडे अधिकाधिक लक्ष देणे, त्यांच्या गरजा समजून घेणे, त्यांना योग्य सवलती देणे यामुळे कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढते. त्याचा परिणाम कंपनीला होणाऱ्या फायद्यातून दिसून येतो, असे डगलस यांचे म्हणणे आहे. गेल्या तीन वर्षात डगलस यांच्या कंपनीतून केवळ पाच लोकांनी नोकरी सोडलीये.