लंडन : कॉर्पोरेट जगात महिला आणि पुरुषांना मॅटनिर्टी तसेच पॅटनिर्टी लिव्ह दिली जाते. याचप्रमाणे महिन्याच्या त्या पाच त्रासदायक दिवसात महिलांना पिरियड लिव्ह देण्याची पद्धत आता कॉर्पोरेटमध्ये सुरु झालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनमधील कोएक्झिस्ट’ या कंपनीने महिलांसाठी पाच दिवसांची पिरियड लिव्ह जाहीर केलीये. अशी सुट्टी जाहीर करणारी ही इंग्लंडमधील पहिली कंपनी आहे. 


मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना मोठ्या प्रमाणात शारिरीक थकवा जाणवतो. तसेच चिडचिडेपणाही वाढतो. यादरम्यान महिलांना आराम मिळावा म्हणून कंपनीने ही सुट्टी जाहीर केलीये. या दिवसांत महिला घरुन काम करु शकतात.