तैवान : घराच्या छपरावर लटकून बसणाऱ्या स्पायडर मॅनला जग कसं दिसत असेल, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? हो, तर आता तो अनुभव तुम्हीही घेऊ शकता. तैवान देशातील तायपेई येथे एका आगळ्यावेगळ्या घराची निर्मिती करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन मजल्यांच्या या घरात सर्वच्या सर्व गोष्टी उलट्या लटकवण्यात आल्या आहेत. जसं की जेवणाचं टेबल - खुर्ची, पलंग, सोफा, टॉयलेट, बाथरुम या सर्व गोष्टी उलट्या लावण्यात आल्या आहेत. या घराच्या आत प्रवेश केल्यावर आपण उलटे चालतोय की घर उलटे आहे, असा प्रश्न सहज कोणालाही पडू शकतो अशा पद्धतीनं हे घर तयार करण्यात आले आहे.


तैवानच्या पर्यटन विभागाने या घराची निर्मिती केली आहे. या घरात चक्क एक गाडीही उलटी लावण्यात आली आहे. हे घर तयार करण्यासाठी साधारण दोन कोटी रुपयांचा खर्च आला आहे. जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे घर तयार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. सध्या इथे येणारे पर्यटक या घरात जास्तीत जास्त फोटो घेण्याचा आनंद लुटतायत.