टॉप 10 समुद्रांमध्ये भारतातले 3 समुद्र
आशियातल्या टॉप 10 समुद्रांमध्ये भारतातले 3 समुद्र आहेत. ट्रॅव्हल वेबसाईट ट्रीप ऍडव्हायजरनं केलेल्या सर्व्हेमध्ये हे समोर आलं आहे.
मुंबई: आशियातल्या टॉप 10 समुद्रांमध्ये भारतातले 3 समुद्र आहेत. ट्रॅव्हल वेबसाईट ट्रीप ऍडव्हायजरनं केलेल्या सर्व्हेमध्ये हे समोर आलं आहे. पर्यटकांनी दाखवलेल्या पसंतीनुसार हा सर्व्हे करण्यात आला.
गोव्यातले अगोंडा, पालोलेम आणि अंदामनचा राधानगर सुमद्र हे आशियातल्या टॉप 10 समुद्रांमध्ये आहेत. यामध्ये अगोंडा समुद्र 4 नंबरवर, पालोलेम सुमद्र 8 व्या तर राधानगर समुद्र दहाव्या क्रमांकावर आहे.
म्यानमारमधला नागपाली समुद्र या सर्व्हेमध्ये 1 नंबरवर आहे. त्यानंतर फिलिपाईन्सचा नॅकपान आणि थायलंडच्या काटानोई समुद्राचा नंबर लागतो.
आशियातल्या सर्वोत्तम 10 समुद्रामध्ये भारतातल्या या 3 समुद्रांचा नंबर लागत असला तरी जगातल्या सर्वोत्तम समुद्रांमध्ये भारतातला एकही समुद्र नसल्याचं या सर्व्हेत समोर आलं आहे.