मॅन्चेस्टर: मिला आणि अनाया, या दहा महिन्यांच्या जुळ्या बहिणी. या दोघींची सध्या मॅन्चेस्टरमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. जुळ्या असुनही या दोघांमधली एक गोरी आहे तर दुसरी सावळी आहे. 
फक्त 10 मिनीटांच्या अंतरानी या दोघींचा जन्म झाला, पण त्यांचा रंग मात्र एकमेकींपासून वेगळा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हनाह यार्कर आणि कायल आर्मस्ट्राँग हे या जुळ्या मुलींचे आई-वडिल आहेत. यातल्या मिलानं आपल्या वडिलांचा कृष्णवर्ण घेतला आहे, तर अनायानं आपल्या आईचा गोरा रंग घेतला आहे.  


सुपर मार्केटमध्ये या दोघींनाही घेऊन गेल्यावर सगळे जण एकच प्रश्न विचारतात अशी प्रतिक्रिया मिला आणि अनायाची आई हनाहनं दिली आहे. लाखांमधल्या एक अशा या मुली मॅन्चेस्टरमध्ये चर्चेचा विषय ठरल्यात.