आयफोन जिंकण्यासाठी त्याने आपले नावच बदलले
आयफोनची क्रेझ जगभरातील लोकांमध्ये दिसून येते. आयफोन मिळवण्यासाठी लोक काय करतील हे सांगता येत नाही. असेच काहीसे युक्रेनमध्ये घडलंय.
युक्रेन : आयफोनची क्रेझ जगभरातील लोकांमध्ये दिसून येते. आयफोन मिळवण्यासाठी लोक काय करतील हे सांगता येत नाही. असेच काहीसे युक्रेनमध्ये घडलंय.
युक्रेनमधीस एका इलेक्ट्रॉनिक दुकानात ऑयफोन मिळवण्यासाठीची स्पर्धा ठेवण्यात आली होती. यावेळी एक अट ठेवण्यात आली होती ती म्हणजे पहिले पाच लोक जे आपली नावे बदलतील त्यांना आयफोन 7 मिळेल.
अॅलेक्झाडर ट्युरिन या 20 वर्षीय युवकाने आयफोन 7 मिळवण्यासाठी चक्क आपले नाव बदलून आयफोन सिम असे ठेवले. आपले नाव बदलण्यासाठी त्याला 2 डॉलरचा खर्च आला.
सुरुवातीला नाव बदलताना अॅलेक्झांडरच्या घरच्यांनी विरोध केला. मात्र हळूहळू विरोध मावळला. दरम्यान, या स्पर्धेत अॅलेक्झांडरने बाजी मारत आयफोन मिळवण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण केले.