वॉशिंग्टन : भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईकनंतर अमेरिकेनेही पाकिस्ताला दहशतवादावरुन फटकारलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हाईट हाऊसमध्ये जारी करण्यात आलेल्या निवेदनात अमेरिकेने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी घटनांबाबत चिंता व्यक्त केलीये. तसेच पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांकडून बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांविरोधघात कारवाई करेल अशी आम्हाला आशा असल्याचे अमेरिकेने म्हटलेय. 


व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जोश अर्नेस्ट म्हणाले की, सर्जिकल स्ट्राईकबाबतच्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. दोन्ही देशांनी बातचीत करुन हा मुद्दा सोडवावा असे आम्हाला वाटते. 


यादरम्यान, जोश यांनी भारतासोबत असल्याचे सांगत अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार आणि भारताच्या सुरक्षा सल्लागार यांची फोनवरुन बातचीत झाल्याचे सांगितले. दहशतवादाविरोधात प्रत्येक लढाईत आम्ही भारतासोबत आहोत, असेही ते पुढे म्हणाले.