अमेरिकेचा अफगाणिस्तानवर सर्वात शक्तीशाली बॉम्बहल्ला
सीरियानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवरही हल्ला केलाय. दहशतवादी संघटना आयएसआयएसचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेनं अण्वस्र विरहित बॉम्बहल्ला केलाय.
नवी दिल्ली : सीरियानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवरही हल्ला केलाय. दहशतवादी संघटना आयएसआयएसचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेनं अण्वस्र विरहित बॉम्बहल्ला केलाय.
अफगाणिस्तानातील आयसीसच्या ठिकाणांवर अण्वस्त्र विरहीत हल्ला करण्यात आल्याची माहिती 'एएनआय' या वृत्तसंस्थेनं 'पेन्टागॉन'च्या हवाल्यानं दिलीय. अफगाणिस्तानातील नगरहार भागात हा हल्ला करण्यात आलाय.
आत्तापर्यंत करण्यात आलेल्या हल्ल्यांमधला हा सर्वात शक्तिशाली हल्ला असल्याचं सांगण्यात येतंय. पहिल्यांदाच अमेरिकेनं हल्ला करताना 'जीबीयू-४३' या बॉम्बचा वापर केलाय. तब्बल 21,000 पौंड वजन असल्याचा हा बॉम्ब असल्याचं समजतंय.