वॉशिंग्टन : भारतातल्या वाढत्या असहिष्णूतेच्या घटनांवर अमेरिकेनं पुन्हा एकदा प्रतिक्रिया नोंदवली आहे. भारतातली वाढती असहिष्णुता आणि हिंसा चिंता करायला लावणारी असल्याचं, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता जॉन किर्बी यांनी म्हंटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरिकांची सुरक्षा आणि दोषींना शिक्षा देण्याकरता सर्वते प्रयत्न करण्याचं आवाहनही, अमेरिकेकडून करण्यात आलं आहे. नुकतीच गुजरातमधल्या उनामध्ये तरुणांना गोरक्षकांकडून मारहाण करण्यात आली होती. तर मध्य प्रदेशातही म्हशीचं मांस घेऊन जाणा-या महिलांना, मारहाणीची घटना नुकतीच घडलीय. या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं भारताला हे आवाहन केलं आहे.