नवी दिल्ली : सीरियामधली परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली आहे. इडलिबमधल्या रासायनिक हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून अमेरिकेनं सीरियाचा एक हवाई तळ क्षेपणास्त्र डागून उद्धस्त केला आहे. यामुळे सीरिया संतापला आहेच, पण रशियाचाही तिळपापड झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची असाद यांच्याबद्दलची ही दोन परस्परविरोधी मतं आहे. त्यांचं मत इतकं बदलण्यास कारण ठरला तो हा रासायनिक हल्ला. हा हल्ला सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या फौजांनी केल्याचा दावा फ्रान्स, ब्रिटनसह अमेरिकेनं केला आहे.


ट्रम्प यांनी असाद यांच्याबाबत भूमिका बदलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमेरिकेच्या टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी सीरियाच्या हवाईतळावर जोरदार हल्ला केला. यूएसएस रोझ आणि यू एस एस पोर्टर या युद्धनौकांवरून तब्बल 59 क्षेपणास्त्र डागली गेली. त्यांनी सीरियातल्या होमसच्या हवाईतळाची अक्षरशः चाळण केली. या हल्ल्यामुळे सीरियामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. हा हल्ला म्हणजे अमेरिकेची मोठी चूक असल्याचं सीरियाचं म्हणणं आहे. तर असाद यांचा जवळचा मित्र असलेला रशियाही यामुळे संतापला आहे.


रशियन ड्युमाच्या एका सदस्यानं तर याच्याही पुढे जात सीरियामधल्या स्थितीची तुलना क्युबा संघर्षासोबत केली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांबाबत रशियामधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना अमेरिकेचे सहकारी ट्रम्प यांच्या कारवाईचं समर्थन करताना दिसत आहेत. अमेरिकेचं अध्यक्षस्थान स्वीकारल्यानंतर अमेरिकेनं केलेली ही आजवरची सर्वात मोठी लष्करी कारवाई आहे पण ही तर सुरूवात आहे. पिक्चर अभी बाकी है. ट्रम्प यांच्या राजवटीत पुढे काय होईल, हे कुणीच सांगू शकत नाही.