ढाका : अल्पसंख्यांकांची पिळवणूक हा काही देशांतर्गत मुद्दा उरलेला नाही. बांग्लादेशात एका हिंदू शिक्षकाला स्थानिकांकडून कान पकडून उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली. या हिंदू शिक्षकानं 'इस्लाम'चा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होतोय. 'द डेली स्टार' या वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, बंदार जिल्ह्यातल्या नारायणगंज भागातील 'पियार सत्तार लतिफ हायस्कूल' या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या श्यामल कान्ती भक्त यांना गर्दीकडून ही शिक्षा देण्यात आलीय. 


श्यामल यांना जमावाकडून मारहाण करण्यात आली... त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाच्या तावडीतून श्यामल यांची सुटका केली. उल्लेखनीय म्हणजे, नारायणगंज भागाचा खासदार सलिम उस्मान देखील जमावासोबत उपस्थित होते. मुख्याध्यापकांना जमावाकडून आणखी कठोर शिक्षा देण्यात येऊ नये यासाठी त्यांना कान पकडून उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली, असं स्पष्टीकरण उस्मान यांनी दिलंय. 


मात्र, श्यामल यांनी आपण कोणत्याही प्रकारे धर्माचा अपमान केला नसल्याचं म्हटलंय. शाळेतील काही व्यक्तींनीच आपल्याला टार्गेट केल्यांचं आणि आपला सूड अशा पद्धतीनं घेतल्याचं श्यामल यांनी म्हटलंय.