व्हिडिओ : कॅमेऱ्यासमोर पाण्याखाली `कॅटरल`नं दिला चिमुकल्याला जन्म
`कॅटरल` नावाच्या एका २८ वर्षीय डॉल्फिननं एका बाळाला जन्म दिलाय... आता तुम्ही म्हणाल यात वेगळं ते काय...?
नवी दिल्ली : 'कॅटरल' नावाच्या एका २८ वर्षीय डॉल्फिननं एका बाळाला जन्म दिलाय... आता तुम्ही म्हणाल यात वेगळं ते काय...?
हा खरोखरच एक अद्भूत क्षण होता. कारण, या चिमुकल्या डॉल्फिनच्या जन्माचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय.
१८ एप्रिल २०१६ रोजी तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अर्ध्या पांढऱ्या रंगाच्या 'कॅटरल'नं आपल्या चिमुकल्याला जन्म दिला. ३ फुटाच्या २५ पाऊंडच्या या चिमुकल्या डॉल्फीननं शेड अॅक्वेरियममध्ये पहिला श्वास घेतला.