नवी दिल्ली : पाकिस्तानाचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2013 साली प्रदर्शित झालेल्या 'ये जवानी है दिवानी' या सिनेमातील 'दिल्ली वाली गर्लफ्रेंड' या गाण्यावर नाईट क्लबमध्ये एक अज्ञात महिलेसोबत थिरकताना परवेझ मुशर्रफ या व्हिडिओत दिसत आहेत. 


पाकिस्तानमधील प्रसिद्ध टॉक शो होस्ट हमीद मीर यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय. आणखी एका व्हिडिओत मुशर्रफ त्यांची पत्नी सेहबा मुशर्रफ यांच्यासोबत थिरकताना दिसत आहेत. 


उल्लेखनीय म्हणजे, बेनझीर भुट्टो, नवाब अकबर बुगती आणि गाझी अब्दुल रशीद यांच्या हत्या प्रकरणासोबतच नोव्हेंबर 2007 मध्ये पाकिस्तानावर लादलेल्या आणीबाणी संदर्भात तसंच न्यायाधीशांना अटक करण्यासाठी मुशर्रफ यांच्यावर अनेख खटले पाकिस्तानात सुरू आहेत. 


मार्च 2016 रोजी मुशर्रफ यांनी पाकिस्तानातून काढता पाय घेत दुबईमध्ये आपलं बस्तान बसवलंय.