मोरांच्या सेक्समुळे गावकरी हैराण
इंग्लंडमधल्या उशा मूर गावातील नागरिक सध्या मोरांच्या सेक्समुळे हैराण झाले आहेत.
इंग्लंड: इंग्लंडमधल्या उशा मूर गावातील नागरिक सध्या मोरांच्या सेक्समुळे हैराण झाले आहेत. सेक्सवेळी होणाऱ्या आवाजमुळे या गावकऱ्यांची झोप उडाली आहे. हे मोर गाड्यांवर चोच आणि नखांनी हल्ले करतात, त्यामुळे गाड्यांनाही स्क्रॅच जात असल्याचं गावकऱ्यांचं म्हणण आहे.
मागच्या सहा वर्षांपासून या त्रासाला सामोरं जावं लागत आहे, याबाबत डरहॅम काऊंटी काऊन्सिलकडे तक्रारही केली आहे, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे. या मोरांचे आवाज हे मानक ध्वनी मापदंडानुसार असल्याचं काऊंसिलचं म्हणणं आहे.
या गावामध्ये सध्या 30 च्या जवळपास मोर असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या मोरांना जंगली पक्षांच्या वर्गात स्थान देण्यात आलेलं नाही, पण त्यांना कोणी पाळलेलंही नाही, त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत गोंधळ असल्याची प्रतिक्रिया द रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्शन या स्वयंसेवी संस्थेनं दिली आहे.