ह्यूस्टन : अमेरिकेत एका वेटरला त्याच्या चांगल्या कामासाठी तब्बल 500 अमेरिकन डॉलप म्हणजेच 34 हजार रुपये टिप मिळालीये. डलासच्या एप्पलीबी रेस्टॉरंटमध्ये काम कऱणाऱ्या सिमोन्ससाठी ही टिप मिळणे हा क्षण कधीही विसरता न येण्यासारखा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्राहकाने रेस्टॉरंटमध्ये सर्वात स्वस्तात मिळणारे फ्लेवर्ड पाणी ऑर्डर केले. याची किंमत केवळ 0.37 डॉलर इतकी होती. मात्र ग्राहकाने याचे बिल चुकते करतानाच तब्बल 500 डॉलरची टिप सिमोन्सला दिली. तसेच इतकी मोठी टिप का दिली याचे कारण लिहिलेली नोटही दिली होती. 


नोटमध्ये लिहिलेल्या मजकुरानुसार, एके दिवशी सिमोन्स किराणा दुकानात सामान खरेदी करत होता. त्यावेळी त्याची नजर एका वृद्ध महिलेवर पडली. ती चिंताग्रस्त दिसत होती. यावेळी सिमोन्सने त्या महिलेची मदत केली. सिमोन्सने त्या महिलेला स्वत:च्या पैशाने सामान खरेदी करुन दिले होते. सिमोन्सचा हा दिलदारपणा तसेच मदत करण्याच्या वृत्तीने त्या वृद्ध महिलेची मुलगी भारावून गेली. 


सिमोन्सला इतक्या मोठ्या रकमेची टिप त्या वृद्ध महिलेच्या मुलीनेच दिली होती. या नोटमध्ये त्या मुलीने लिहिले होते, माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझी आई खूपच निराश झाली होती. तुझ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्यामुळेच मी ही टिप देतेय.


त्या भल्यामोठ्या टिपसोबत मिळालेली नोट वाचून सिमोन्सलाही भावना आवरल्या नाहीत. पेरलं तसं उगवत असं म्हणतात त्याचप्रमाणे तुम्ही जसे जगाशी वागता तशीच वागणूक तुम्हाला जगाकडून मिळते हे मात्र या घटनेनं पुन्हा अधोरेखित होतं.