गॉडझिला जेव्हा दार ठोठावतो... प्रचंड पालीचा घरात घुसण्याचा प्रयत्न
आतापर्यंत तुम्ही येवढी मोठी पाल किंवा घोरपड पाहिली नसेल. गॉडझिलाच्या साईजची ही घोरपड सध्या सोशल मीडिया सर्वांना घाबरवत आहे.
बँकॉक : आतापर्यंत तुम्ही येवढी मोठी पाल किंवा घोरपड पाहिली नसेल. गॉडझिलाच्या साईजची ही घोरपड सध्या सोशल मीडिया सर्वांना घाबरवत आहे.
थायलंडच्या एका रहिवाशाने हा व्हिडिओ काढला असून त्याच्या घरात ही प्रचंड पाल घुसण्याचा प्रयत्न करत होती.
अट्टानाई थाययुंगोग यांच्या घरातही पाल घुसण्याचा प्रयत्न करीत होती. हा व्हिडिओ त्याने लगेच फेसबूकवर टाकला.
एका दरवाज्याच्या उंचीची ही पाल घरात घुसण्याचा प्रयत्न करत होती. तिला पकडण्याचा प्रयत्न केला असता ती शेपटीने वार करतहोती.
ही मोठी पाल आपल्या शेपटीने काचेच्या दरवाजाला शेपटीने फटके मारत होती. या पालीवर कुत्रे भुंकत होते.
पाहा या पालीचा व्हिडिओ...