वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये संशयास्पद वस्तू सापडली आहे. संशयास्पद असं एक पॅकेट व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉनमध्ये सापडलं आहे. सिक्रेट सर्व्हिस शूटर्सकडून या परिसराची पाहणी करण्यात येत आहे. दरम्यान संशयास्पद वस्तू सापडल्यामुळे व्हाईट हाऊस काही काळासाठी बंद करण्यात आलं आहे.