न्यूयार्क : अमेरिकेत वर्णद्वेषातून भारतीयांवर होणारे हल्ले आणि हत्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. न्यू जर्सीमध्ये गुरुवारी एका भारतीय वंशाच्या महिला सॉफ्टवेअर इंजीनिअरची तिच्या सात वर्षाच्या मुलासोबत निर्घृण हत्या केल्याची घटना ताजी असतानाच न्यूयॉर्कमध्ये मूळ भारतीय वंशाच्या शीख तरुणीला वर्णद्वेषाचा सामना करावा लागलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकन नागरिकाने तिच्यावर वर्णभेदी टीका केली आणि आपल्या देशातून चालती हो अशी धमकी दिलीय. राजप्रीत हिर असं या शीख तरुणीचं नाव आहे. तू या देशाची नाहीस, तुझा या देशाशी संबंध नाही, तुझ्या देशात परत जा अशा शब्दात या अमेरिकन नागरिकाने तिला धमकी दिलीय.


राजप्रीत ही मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी सबवे ट्रेनने जात होती. त्यावेळी एका अमेरिकन नागरिकाला राजप्रीत ही मिडल-ईस्टची असल्याचं वाटलं आणि त्याने तिच्याशी गैरवर्तन केलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ न्यूयार्क टाईम्सने पोस्ट केलाय.