केनिया : जगातला शेवटचा दुर्मिळ प्रजातीचा पांढरा गेंडा डेटिंग अॅप 'टिंडर'शी जोडला गेलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नष्ट होत चाललेल्या गेंड्यांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी फंड गोळा करण्यासाठी या गेंड्याच्या फोटोचा वापर अॅपवर केलाय.


हा पांढऱ्या रंगाचा गेंडा आता म्हातारा झालाय. आपल्या दोन मादा साथिदारांसोबत तो केनियाच्या जंगलात राहतोय. त्याच्या प्रजननाचे अनेक प्रयत्न अयशस्वी ठरलेत. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या गेंड्याच्या कृत्रिम रुपातील प्रजननासाठी (आयव्हीएफच्या माध्यमातून) एक करोड डॉलर्सची गरज आहे.


या गेंड्यांच्या किंमती शिंगांसाठी त्यांची शिकार केली जाते. त्यामुळे ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मागे उरलेल्या शेवटच्या नरासाठी 24 तास त्याच्यावर सुरक्षा नजर ठेवली जाते.