मुंबई : रशियन नागरिक फारसे हसत का नाहीत ? रशियाला गेलेल्या प्रत्येक भारतीयाला हमखास पडणारा हा प्रश्न... या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या संस्कृतीत लपलंय. मुंबईच्या 'रशिया इन्फॉर्मेशन सेंटर'तर्फे गेल्या आठवड्यात एक टूरिस्ट हॅन्डबूक प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकात या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनोळखी लोकांशी हसणं रशियन संस्कृतीत बसत नाही. तेथील नागरिक अतिशय विनम्र आणि प्रोफेशनल असतात. पूर्ण ओळख झाल्याशिवाय ते कोणाशीही मोकळं वागत नाहीत, असं यात म्हटलं गेलंय. 


या आणि अशाच रशियाबाबतच्या अनेक रंजक गोष्टींची नोंद या 'टूरिस्ट गाइड'मध्ये आहे. रशियाचं समाजजीवन, तेथील संस्कृती यांविषयी देखील या पुस्तकात थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. अगरबत्तीच्या वासाने इतर पर्यटकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे येथील हॉटेलच्या रूम्समध्ये अगरबत्ती पेटवण्यास मनाई आहे. भारतीय आणि रशियन यांच्यात एकच साम्य आहे; ते म्हणजे या दोघांनाही चहा आवडतो. पण रशियन दूधाशिवाय चहा पितात. रशियात पिण्याचे पाणी बीयरपेक्षा जास्त किंमतीत विकले जाते.


भारतात वापरले जाणारे विविध प्रकारचे मसाले तिथे मिळत नाहीत. त्यामुळे तिथे जाणाऱ्या भारतीयांनी सर्व मसाले आपल्यासोबत घेऊन जावे, असं गंमतीनं या पुस्तकात म्हटलं गेलंय.