COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : कुणी विचारही करू शकणार नाही, अशी एक धक्कादायक घटना मॉस्कोमध्ये घडल्याचं उघडकीस आलंय. काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये एक बाई भरदिवसा एका लहान मुलाचं कापलेलं मुंडकं घेऊन जोरजोरात ओरडताना अनेकांनी पाहिली. 


या घटनेचा व्हिडिओ सोशल वेबसाईटवर व्हायरल झालाय. मॉस्कोच्या एका मेट्रो स्टेशनजवळ या महिलेला पोलिसांनी अटक केलीय. 


'लाईफन्यूज'नं दिलेल्या बातमीनुसार, स्थानिक पोलिसांनी या महिलेला थांबवल्यानंतर तिनं आपल्या बॅगमधून एका तीन-चार वर्षांच्या मुलीचं कापलेलं मुंडकं बाहेर काढलं... आणि 'मी दहशतवादी आहे' असं ती भररस्त्यावर ओरडू लागली. नास्त्या असं या घटनेला बळी पडलेल्या चिमुकलीचं नाव आहे. 


आपल्या पतीनं आपला विश्वासघात केल्याचं या महिलेचं म्हणणं आहे... परंतु, हत्या करण्यात आलेल्या चिमुकलीचा या प्रकरणाशी काय संबंध याचा खुलासा मात्र तिला करता आला नाही.