नवी दिल्ली : महिलांना पळवून त्यांना परदेशात विकण्याचा धंदा जोरात आहे. खासकरुन पाश्चात्य राष्ट्रांत या महिला विकण्याचा धंदा जगभरात चालतो. यात आग्नेय आशियाई देशांतील महिलांना खूप मागणी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही वर्षांपूर्वी परदेशातील एका वृत्तपत्रात 'पत्नी विकत घ्या' अशा मथळ्याखाली एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ज्याच्याकडे ६००० डॉलर्स इतकी रक्कम आहे त्या व्यक्तीला पत्नी 'विकत' घेणे सहज शक्य होते. या मुली व्हिएतनाम देशातील असल्याचे या जाहिरातीत म्हटले आहे.


त्याचप्रमाणे पैसे दिल्यापासून ९० दिवसांच्या आत या मुली त्या व्यक्तीच्या घरी पोहोचवल्या जातील, असे आश्वासन देण्यात येते. त्याचप्रमाणे, या मुली १०० टक्के व्हर्जिन असतील, अशी हमी पण यात देण्यात आली आहे.


इतकंच काय तर त्यांना पोहोचवण्यासाठी कोणतेही अधिकचे मूल्य आकारले जाणार नसल्याचेही ते सांगतात. त्याहीपेक्षा कहर म्हणजे ही विकत घेतलेली बायको पळून गेली तर कोणत्याही शुल्काशिवाय नवीन बायको दिली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे. दरम्यान, महिलांच्या तस्करीची जाहिरात खुलेआमपणे प्रसिद्ध केल्याने या वृत्तपत्रावरही टीकेची झोड उठली होती.