स्टॅाकहोम: भारताच्या पंतप्रधानांनी काळ्यापैशावर अंकुश बसवण्यासाठी 500 आणि 1000 च्या जुन्या नोटांवर बंदी घातली,परंतु स्वीडन देशातील रिक्स बॅंक ई-चलन लागू करण्याचा निर्णय घेत आहे. 
ई-चलन म्हणजे एक डिजिटल करंन्सी आहे. ती आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड, तसेच पेटीएम सारख्या अनेक माध्यमातून वापरत असतो.
रिक्स बॅंकेकडून जर ई-चलन आणण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली, तर स्वीडन हा पहिला ई-चलन लागू करणारा देश ठरेल.
रिक्स बॅंकेच्या डेप्युटी गर्वनर सीसिलिया स्काइंग्जली यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आता रोखरक्कमेच्या स्वरूपातील व्यवहार अतिशय कमी होत आहेत, त्यामुळे या प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचा विचार चालू आहे, तसेच बहुतेक लोकांना काही कारणांमुळे प्रत्येक वेळी बॅंकेत जाणे शक्य नसते. त्यामुळे लोकांना ई-चलन वापरणे सोईस्कर जात आहे.
गेल्या काळापासून नोटांच्या उपयोगात मोठ्याप्रमाणात घसरण झाली आहे. जर आकड्यांच्या अनुषांगाने विचार करायला गेला तर बॅंकेतील नोटा स्वीडनच्या जीडीपीत 1.5 टक्के आहे. 1950 च्या काळात हेच जीडीपीचे प्रमाण 10 टक्के होते.