ग्वाडलहारा :  जगातील सर्वात वजनी व्यक्तीचे वजन कमी करण्यासाठी त्याच्यावर गॅस्ट्रिक बायपास सर्जरी करण्यात आली त्याचे वजन ६०० किलोच्या आसपास होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅक्सिकोमध्ये त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, त्याचे असलेल्या वजनाच्या निम्मे वजन करणे हे सर्जरी करण्याचे उद्दीष्ट होते. या सर्जरीनंतर आणखी ऑपरेशन करण्यात येणार आहे. 


डॉ. जोस कास्टानेडा यांनी काल सांगितले की ही सर्जरी यशस्वी झाली आहे. आता त्याचे शरीर या बदलांना कसा प्रतिसाद देतात हे पाहावे लागणार आहे. मला आशा आहे की सर्व काही ठीक होईल. या सर्जरीनंतर पेशंटची प्रकृती ठीक असून त्याच्या डॉक्टर नजर ठेऊन आहेत. 


जगातील सर्वात वजनी पुरूष असलेला फ्रांकोचे वजन ५९५ किलो होते. सर्जरी कमी करण्यासाठी त्याला वजन कमी करण्याची तसेच डायबिटीज आणि रक्तदाब नियंत्रित आणण्याचा सल्ला दिला होता. त्याचे आमशय यानंतर आकाराने अर्धे होणार आहे. त्याच्या आतड्यांचीही सर्जरी होणार आहे. 


डॉक्टरांनी सांगितले की, पेशंटला मनोवैज्ञानिक आणि आहारात प्रगती करणे गरजेचे आहे. त्याने हे नाही केले तर आमचे प्रयत्न विफल होती.