मुंबई : अमेरिकेन 'याहू' या ई-मेल सेवा पुरविणाऱ्या कंपनीचा डेटा चोरीला गेलाय. हॅकर्संनं जवळपास ५० कोटी ई-मेल अकाउंट्सचा डाटा चोरी केल्याचं वृत्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्ता पर्यंतच्या सायबर क्राइमच्या गुन्ह्यातला हा सर्वात मोठा  अपराध असल्याचं याहू कंपनीनं सांगितले आहे.


यापूर्वीही २०१४ साली 'याहू'चे सर्व अकाऊंट हॅक झाले होते. या सर्व ई-मेल अकाउंट्सच्या हॅकर्संनी चोरी केलेल्या माहितीमध्ये यूजर्सचं नाव, फोन नंबर, पासवर्ड आणि ई-मेलचा समावेश आहे.


या घटनेमध्ये अनप्रोटेक्टेड पासवर्ड, यूजर्सच्या बँक खात्यासंबधीत माहिती आणि पेमेंट कार्ड डाटा चोरी अशा माहितीचा समावेश नाही, असं कंपनीनं म्हटलंय.