मुंबई : ऐ दिल है मुश्किल सिनेमावरुन सध्या राज्यात वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या सिनेमाला प्रदर्शित करण्यास विरोध केला आहे. करण जोहरने या वादावर मौन सोडत यापुढे पुन्हा पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही असं म्हटलं होतं. पण हा सिनेमा रिलीज होऊ द्या असं आवाहन देखील केलं होतं पण मनसेने या सिनेमाच्या रिलीजला विरोध कायम ठेवत सिनेमागृहांच्या मालकांना सिनेमा प्रदर्शित न करण्याचं निवेदन देऊन इशारा दिला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐ दिल है मुश्किल या सिनेमाच्या प्रदर्शित होण्यावर वाद होऊ शकतो. मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे की, प्रत्येक सिनेमागृहांना सुरक्षा देण्यासाठी मुंबई पोलीस तयार आहे. ही मुंबई पोलिसांची जबाबदारी आहे. मुंबईतील प्रत्येक सिनेमागृहांना सुरक्षा पुरवण्यात येईल. कायदा-सुव्यवस्था मुंबई पोलीस बिघडू देणार नाही. असं देखील मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.


वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या १२ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत या कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्यांना अटक केल्यामुळे हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


सिनेमाला वाढता विरोध पाहता निर्माता करण जोहरने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली होती. करणने मंगळवारी बॉलीवूडमधील काही मंडळींसह मुंबई पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांची भेट घेऊन सुरक्षा पुरविण्याची मागणी केली होती.