मुंबई : ६३ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या दिमाखात फार पडला. राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या मान्यवरांचा यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरविण्यात आलं. यावेळी मनोज कुमार यांच्या कारकिर्दीवरील एक चित्रफितही दाखविण्यात आली. टाळ्यांच्या गजरात राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.


- राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडाही मोठ्या दिमाखात फडकला.


- कट्यार काळजात घुसली सिनेमातील गायनासाठी महेश काळेंचा गौरव करण्यात आला.


- रिंगणला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा


- तर नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटफेम रिंकु राजगुरूला विशेष लक्षवेधी अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.


- मिथुनचंद्र चौधरी दिग्दर्शित पायवाट या लघुपटाला सर्वोत्कृष्ट शैक्षणिक लघुपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


- 'पिकू'मधल्या अभिनयासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता 


- तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कंगना राणावतचा सन्मान करण्यात आला. कंगणाने सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवलीय.


- सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून बाहुबलीचा गौरव केला गेला. तर संजय लीला भन्साळींना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा बहुमान मिळालाय. 


- संजय लीला भन्साळी यांना पुरस्कार प्रदान


 


इथे पाहा, हा सोहळा