मुंबई : दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी अभिनेता आमीर खानने सुरु केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रातील 30 तालुके यामध्ये सहभागी झाली आहेत. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं स्पर्धेबाबत एक म्युझिक व्हिडिओचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर लॉन्चिंग केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमीरची पत्नी किरण या व्हिडिओतून पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पदार्पण करते आहे. विशेष म्हणजे किरण राव हे गाणं मराठीत गायलंय. गुरु ठाकूरने हे गाणं लिहिलं असून अजय-अतुलने संगीतबद्ध केलं आहे.


दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन केलं असून ‘सैराट’ फेम आर्ची-परशा अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर या व्हिडिओ झळकली आहेत. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या पहिल्या पर्वात साताऱ्यातील वेळू हे गाव अव्वल आलं होतं, त्यामुळे साहजिकचं दुस-या पर्वाबद्दल उत्सुकता आता वाढली आहे.


पाहा सत्यमेव जयते वॉटर कपचं अँथम साँग