आमीरच्या दंगलचं पोस्टर रिलीज
आमीर खानच्या चित्रपट `दंगल`चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. म्हारी छोरियाँ छोरों से कम हैं के? असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.
मुंबई : आमीर खानच्या चित्रपट 'दंगल'चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. म्हारी छोरियाँ छोरों से कम हैं के? असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.
या पोस्टरमध्ये आमीर खान चित्रपटातील आपल्या ४ मुलींसोबत दिसत आहे.
आमीर खानने स्वत: त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केलं आहे. काही दिवसांपूर्वी आमीर खानने आपला रावडी लूकदेखील शेअर केला होता.
कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या आयुष्यावर आधारित 'दंगल' चित्रपट २३ डिसेंबरला नाताळच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात येणार आहे
या चित्रपटात महावीर फोगट यांनी आपल्या दोन मुली, गीता आणि बबिता कुमारी यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले, ही कथा मांडण्यात आली आहे.
या चित्रपटात आमीर खान सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांची भूमिका साकारत आहे.