जयंती वाघधरे , मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खान इज बॅक. पीके या सिनेमानंतर तब्बल दोन वर्षांनी अमिर खानचा सिनेमा आज आपल्या भेटीला आला आहे. अमिर खान आणि क्रिस्टमसचं एक जुनं नातं आहे. त्याचे  'थ्री इडियट्स', 'तारे जमीन पर', 'गजनी', 'धूम 3', 'पीके' सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे ख्रिसमसलाच प्रदर्शित झालेत. आज 'दंगल' रुपेरी पडद्यावर झळकत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४साली आलेल्या अमिर खानच्या पीके या सिनेमानं आतापर्यंत वर्ल्डवाईड तब्बल ७९० कोटींची कमाई केली. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख असो किंवा सलमान, पीके या सिनेमाचा रेकॉर्ड अजून कोणीही मोडू शकलेला नाही. आता स्वत: अमिर खानच आपल्या सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करु शकेल का, हे पाहणे इंटरेस्टींग ठरेल. 


यांच्या जीवनावर आधारित सिनेमा


आज बिग स्क्रिनवर अमिर खानचा मोस्ट अवेटेट 'दंगल' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हरियाणाचे कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गीता आणि बबिता फोगट यांच्यावर आधारित 'दंगल' हा एक बायोपिक सिनेमा आहे. आमीर खानची निर्मीती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी. 


कसा आहे दंगल, हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का, काय आहे या सिनेमाची खरी स्टोरी, तुम्हाला सांगणार आहोत. हरियाणाच्या एका छोट्याशा गावाची ही गोष्ट आहे.


मुलाचा हट्ट आणि कुस्ती


महावीर फोगट एक राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी सुवर्ण पदक आणण्याचं स्वप्न ते पूर्ण करु शकले नाहीत. म्हणून आपला होणारा मुलगा आपलं स्वप्न पूर्ण करेल त्यांना त्याला वाटते. एका पाठोपाठ एक चार मुली झाल्यानंतर ते या सगळ्या आशा सोडून देतात. याच दरम्यान त्याच्या मुली गीता आणि बबिता, आपली छेड काढल्यामुळे दोन मुलांना चांगलाच मार देतात. चक्क मुलींनी मुलांना लोळून टाकले. याच गोष्टीचे त्यांना क्लिक होते. महावीर फोगटला कळून चूकते की आपल्या मुली मुलांपेक्षा कमी नाही आणि तेव्हाच ते या दोघीं मुलींना कुस्तीसाठी प्रशिक्षण देण्याचा निश्चय करतात. व्यावसायिक कुस्तीपटू तयार करायला जे जे काही लागतं त्या सगळ्या गोष्टी ते या दोन्ही मुलींना पुरवतात. आणि अशा प्रकारे सुरु होते गीता आणि बबिता फोगटची ट्रेनिंग..


सिनेमाचे यश


दिग्दर्शक नितोश तिवारी यांनी सिनेमाला छान ट्रीटमेंट दिली आहे, विशेष करुन सिनेमाचं कास्टींग एकदम परफेक्ट बसलंय. छोट्या गीता फोगटच्या व्यक्तिरेखेत दिसणा-या अभिनेत्री झायमा वसीमनं तिची भूमिका चोख पार पाडली आहे. राहिला प्रश्न अमिर खानचा तर उगीचच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटलं जात नाही. या सिनेमात अमिरचे दोन शेड्स पाहायला मिळतात. 



या दोन्ही करॅक्टरसाठी त्यानं जीव तोडून मेहनत केली आहे, हे सिनेमा पाहताना दिसते. सिनेमाचे संवाद कमालीचे आहेत. कधी हसवणारे तर कधी भावूक करणारे हे डायलॉग्स तुमचं फुलटू मनोरंजन करतात, इनफॅक्ट तुम्हाला होल्ड करुन ठेवतात. सिनेमाचं संगीत कमाल आहे. संगीतकार प्रितमनं कंपोस केलेलं बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है, हे गाणं असो किंवा दे धाक्कड, सिनेमातली सिनेमाच्या मूडप्रमाणे परफेक्ट सेट झाली आहेत.


इंटरवरच्या आधीचा दंगल फुलटू एंटरटेनिंग वाटतो, वडील मुलीचं सुंदर रिलेशन दिगदर्शक नितेश तिवारीनं यात टिपण्याचा प्रयत्न केलाय. सिनेमाचा शेवट झालाय. 


सिनेमाला स्टार्स


खरंतर सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये काय होणार आहे, हे आपल्याया माहीत असून सुद्धा आपण त्या सीनमध्ये वाहत जातो, हेच सिनेमाच्या कलाकार आणि दिग्दर्शकाचं खरं यश आहे. दंगलमध्ये गिरीश कुलकर्णीचीही मह्त्वाची व्यक्तिरेखा आहे. त्यानी त्याची भुमिका चोख पार पाडली आहे. तेव्हा हे सगळे फॅकटर्स पाहून दंगल या सिनेमाला ३.५ स्टार्स..