अभिषेक बच्चनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
बॉलीवूडचा ज्युनियर बच्चन अशी ओळख असलेल्या अभिषेक बच्चनच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालीये. १२ तासांत सर्वाधिक वेळा जनतेसमोर येणारा स्टार म्हणून त्याची गिनीज बुकात नोंद झालीये.
मुंबई : बॉलीवूडचा ज्युनियर बच्चन अशी ओळख असलेल्या अभिषेक बच्चनच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालीये. १२ तासांत सर्वाधिक वेळा जनतेसमोर येणारा स्टार म्हणून त्याची गिनीज बुकात नोंद झालीये.
अभिषेक २००९मध्ये दिल्ली ६च्या प्रमोशनदरम्यान १२ तासांत ७ शहरांत दिसला होता. या शहरांमध्ये गाझियाबाद, नोएडा, फरिदाबाद, दिल्ली, गुडगाव, चंदीगड आणि मुंबईचा समावेश आहे.
याकामासाठी त्याने प्रायव्हेट जेट तसेच कारने तब्बल १८०० किमीचा प्रवास केला होता. याबाबतीत अभिषेकने हॉलीवूड अभिनेता विल स्मिथलाही मागे टाकले. त्याने २००४मध्ये रोबोटच्या प्रमोशनदरम्यान दोन तासांत तीन वेळा जनतेसमोर आला होता.