त्यानं केआरकेची उतरवली
ट्विटरवरून दिग्गजांवर टीका करणारा केआरके कायमच वादामध्ये असतो. स्वत:ला चित्रपट समिक्षक समजणारा केआरके प्रत्येक आठवड्याला चित्रपटांची समिक्षा करतो.
मुंबई: ट्विटरवरून दिग्गजांवर टीका करणारा केआरके कायमच वादामध्ये असतो. स्वत:ला चित्रपट समिक्षक समजणारा केआरके प्रत्येक आठवड्याला चित्रपटांची समिक्षा करतो.
सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर, लिसा हेडन यांच्यासारख्या अभिनेत्रींबाबतही केआरकेनं वादग्रस्त ट्विट केली होती. यावर सोनाक्षी सिन्हानं त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. नुकतंच आलिया भटबाबत केलेल्या वक्तव्यावरून सिद्धार्थ मल्होत्रानंही त्याच्यावर टीका केली होती.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडीन असंही केआरके म्हणाला होता. केआरकेच्या या सगळ्या वादग्रस्त वक्तव्यावर अभिषेक शर्मा नावाच्या व्यक्तीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. हा व्हिडिओ त्यानं यूट्यूबवर अपलोड केला आहे.
यामुळे केआरके चांगलाच भडकला आहे. एका आठवड्यामध्ये पोलिसांनी त्याचा पत्ता शोधला नाही तर मी त्याला कोर्टामध्ये खेचीन, असं ट्विट केआरकेनं केलं आहे.
त्यानं केआरकेची उतरवली, पाहा व्हिडिओ